चौसर - 2019
चौसर मांडला
बर्याच प्रतीक्षेनंतर चौसराचा खेळ मांडला गेला. ऑक्टोबरच्या 21 रोजी या चौसराच्या पटावर अखेरचे दान पडणार असून या खेळातील सगळ्याच सोंगट्यांचं भविष्य 24 ऑक्टोबरला म्हणजे दिवाळीच्या पहिल्याच दिवशी ठरणार आहे. त्यानंतरच पटावर राहणार्या आणि डब्यात जाणार्या सोंगट्या कोणत्या हे स्पष्ट होईल. तोपर्यंत उडवला जाईल तो आरोप - प्रत्यारोपांचा, दावे - प्रतिदाव्यांचा धुराळा. आज निवडणूक आयोगाने चौसराच्या या मखमली पटाचे रेशमी बंध सोडून त्याचे दुमडलेले कोेन चार दिशांना उघड करून ठेवले आहेत. समोरासमोर आलेले पट्टीचे खेळाडू, त्यांना दान टाकण्यासाठी उद्युक्त करणारे बघे, मनासारखे दान पडल्यानंतर होणारा उन्माद आणि मनाविरुद्ध फासे पडल्याचे नैराश्य, त्यातून पुन्हा पेटून उठणारी नवी आशा असा हा खेळ हळूहळू रंगणार आहे. आजपासून बरोब्बर एक महिना हा खेळ रंगेल अन् यात अखेरचा फासा आपल्या दुबळ्या हाताने खंगाळून दान टाकेल ती जनताच.
अर्थात या पटावरही कुणीतरी धर्मराज सर्वस्व पणाला लावेल, कुणीतरी भिम दुर्योधनाची मांडी फोडण्याचा पण करेल, कुणीतरी धृतराष्ट्र डोळ्यावर पट्टी बांंधून अधर्माची बाजू लढवत राहील, कुण्यातरी द्रौपदीचं वस्त्रहरण होताना अदृष्य रुपाने कृष्ण धाऊन येईल, तर कुणीतरी शकुनी स्वार्थापोटी रक्ताच्या नात्यांमध्ये दरी निर्माण करेल तर कुणीतरी भिष्म, गांधारी आपापल्या वचनांमुळे हतबल झालेले दिसतील... चौसराचा हा खेळ म्हणूनच राजकारणाच्या अधिक जवळचा.
गत पाच वर्षांपूर्वी मांडलेला चौसराचा पट चंदनाच्या जाळीदार पेटीत गुंडाळून ठेवला होता. विविध बाजुच्या सोंगट्या हस्तीदंती डबीत विसावल्या होत्या. त्या डबीतल्या डबीत काही सोंगट्यांनी रंग बदलले, काहींनी एकमेकांचे रंग घेतलेे. काहींना चकाकी आली तर काही पुन्हा पटावर मांडण्याच्या लायकीच्याही राहिल्या नाहीत. आता पटावर येणार्या सोंगट्या आणि त्यांची जागा दान टाकणारे हात ठरवतील, तोपर्यंत आपण विजयाच्या अंदाजाने कधी किंचाळायचे तर पराभवाच्या अंदाजाने कधी चुकचुकायचे...
गेल्यावेळी भाजप - शिवसेना - काँगे्रस व राष्ट्रवादी काँग्रेसने वेगवेगळा आणि एकमेकांविरुद्ध खेळ मांडला, त्यामुळे चुरस वाढली होती. भाजपच्या बाजुने फासे पडले आणि शिवसेनेला त्यांच्या पाठी फरफटत जावे लागले. भाजपला एकूण 122 तर शिवसेनेला 63 जागी यश मिळाले. काँग्रेस व राष्ट्रवादीला अनुक्रमे 42 व 41 मतदारसंघ राखता आले. अपक्ष 7, शेकाप 3, एमआयएम 2, भारिप -बहुजन महासंघ, मनसे, रासप, माकप, सपा यांचा प्रत्येकी एक उमेदवार विजयी झाला.
मुंबई (एकूण जागा 36) ः पैकी भाजप - 18, शिवसेना - 13, काँग्रेस - 5, एमआयएम - 1.
ठाणे - कोकण (एकूण जागा 38) ः भाजप - 7, शिवसेना - 15, राष्ट्रवादी - 8, काँग्रेस - 1, शेकाप - 2, बहुजन विकास आघाडी - 3, सपा, अपक्ष प्रत्येकी - 1
पश्चिम महाराष्ट्र (एकूण जागा 70) ः भाजप - 24, शिवसेना - 13, काँग्रेस - 10, राष्ट्रवादी - 19, शेकाप, अपक्ष, मनसे, रासप प्रत्येकी - 1
उत्तर महाराष्ट्र (एकूण जागा 35) ः भाजप - 13, शिवसेना - 7, काँग्रेस - 7, राष्ट्रवादी - 6, माकप, अपक्ष प्रत्येकी - 1
मराठवाडा (एकूण जागा 46) ः भाजप - 15, शिवसेना -11, काँग्रेस - 9, राष्ट्रवादी - 8
विदर्भ (एकूण जागा 63) ः भाजप - 45, शिवसेना - 3, काँग्रेस - 10, राष्ट्रवादी, भारिप प्रत्येकी - 1, अपक्ष - 2.
--

0 Response to " "
टिप्पणी पोस्ट करा