मिनीट्रेनचा जनकच उपेक्षित
- माथेरान परिषदेची कृतघ्नता
16 लाखांचा खर्च
आदमजी पिरभॉय यांचे सामाजिक कार्य पाहता त्यांना कैसर -ए- हिंद आणि सर ही पदवी ब्रिटीश सरकारने बहाल केली. वडलांप्रमाणेच अब्दुल हुसेन यांनी अनेक सामाजिक कार्याला वाहून घेतले. माथेरानला रेल्वेने जोडण्याचे त्यांचेे स्वप्न हे त्याचाच एक भाग होता. माथेरानला मिनिट्रेन सुरु करण्यासाठी अब्दुल हुसेन यांनी 1907 च्या दरम्यान स्वतःचे 16 लाख रुपये खर्च केला. त्याकाळात सोन्याचा दर केवळ 16 रुपये तोळा होता. आपल्या कल्पकतेतून जागतिक वारसा ठरणारी मिनिट्रेन माथेरानला देणार्या अब्दुल हुसेन यांनी आर्थिक भारही उचलला होता. मात्र, त्यांच्या कार्याची दखल स्थानिक स्वराज्य संस्थेला अद्याप घ्यावीशी वाटलेली नाही.
- लोक चळवळ उभी राहावी
जगात माथेरानला वेगळी ओळख मिळवून देणारी मिनीट्रेन सुरू करणारे अब्दुल हुसेन सर आदमजी पिरभॉय यांंच्या प्रति स्थानिक स्वराज्य संस्थेची कृतघ्नतेची वर्तणूक तमाम माथेरानप्रेमींना चीड आणणारी ठरत आहे. सव्वाशे वर्षांपूर्वी माथेरानमध्ये मिनीट्रेन सुरू करणारा, या गिरीस्थानाच्या विकासाचा मार्ग आखणारा जनकच स्थानिक राजकीय अहंकारामुळे उपेक्षित ठरला आहे.
मुंबईपासून जवळ असलेल्या आणि तरीही गिरीस्थान असल्याने सर्वसामान्यांना पोहचण्यास कठीण असलेल्या माथेरानला शहराशी जोडण्याचे स्वप्न 20 व्या शतकाच्या सुरुवातीला अब्दुल हुसेन सर आदमजी पिरभॉय यांनी पाहिले. माथेरानला जाणारा खडतर मार्ग सूकर करण्याच्या दृष्टीने अब्दुल हुसेन यांनी मिनीट्रेनची संकल्पना मांडली. त्याकाळातील मोठे उद्योजक असल्याने आणि सर आदमजी पिरभॉय यांच्या अफाट सेवाकार्यामुळे ब्रिटीश सरकारने त्यांना रेल्वे सुरु करण्यासाठी परवानगी दिली. सन 1901 ते 1907 दरम्यान रेल्वेच्या प्रत्यक्ष उभारणीस सुरुवात झाली. रेल्वे रुळ टाकण्यासाठीची सर्व जागा पिरभॉय यांनी स्वखर्चाने खरेदी केली. तब्बल सहा वर्षांच्या खडतर कामानंतर 1907 मध्ये प्रत्यक्ष नेरळ माथेरान रेल्वे पहिल्यांदा धावली. माथेरानपर्यंत रेल्वे पोहचविण्यासाठी अब्दुल हुसेन सर आदमजी पिरभॉय यांनी त्या काळात स्वतःचे 16 लाख रुपये खर्च केले.
या मिनिट्रेनमुळे आजही सव्वाशे वर्षांनंतर दरवर्षी लाखो पर्यटक माथेरानपर्यंत पोहचतात. या ट्रेनचे पर्यटकांना आकर्षण आहे तर मिनिटे्रनमुळेच माथेरानची अर्थव्यवस्था पर्यटनाच्या उद्योगावर उभारली आणि विकसित झाली आहे. मात्र, मिनिट्रेनचे जनक अब्दुल हुसेन सर आदमजी पिरभॉय यांच्याप्रति माथेरान गिरीस्थान नगर परिषदेची वर्तणूक ही कृतघ्नतेची आहे. पिरभॉय यांचे नातू अली अकबर पिरभॉय यांनी त्यांच्या आजोबांचा माथेरानच्या विकासातील वाटा नव्या पिढ्यांपयर्र्ंत पोहचावा, यासाठी माथेरानच्या एका चौकाला ’अब्दुल हुसेन सर आदमजी पिरभॉय’ यांचे नाव देण्याची मागणी नगरपरिषदेकडे केली होती. परिषदेच्या पदाधिकार्यांशी चर्चा करून त्यांनी दि. 18 ऑगस्ट 2018 रोजी चौकाच्या नामकरणाची तयारीही केली. त्यासाठी कोनशिला तयार केली.
परंतु, न.प.च्या पदाधिकार्यांचा क्षुल्लक राजकीय अहंगंड आडवा आला आणि ’अब्दुल हुसेन सर आदमजी पिरभॉय’ यांच्याप्रति कृतज्ञता व्यक्त करण्याचा त्यांंना विसर पडला. तेव्हापासून अलि अकबर आदमजी पिरभॉय हे माथेरान रेल्वेेच्या जनकाला न्याय मिळावा म्हणून प्रयत्नशील आहेत. पिरभॉय यांच्या माथेरान विकासातील योगदानाची दखल घेतली जावी, यासाठी लोकचळवळ उभी राहावी, त्याशिवाय नगर परिषदेचा अहंकार कमी होणार नाही, अशीच स्थिती आहे.

मध्य रेल्वेकडून सलामी
मिनिट्रेन सुरू करणार्या अब्दुल हुसेन सर आदमजी पिरभॉय यांच्याकडे क्षुल्लक राजकीय स्वार्थामुळे माथेरान नगर परिषद दुर्लक्ष करीत असली तरीही मध्य रेल्वेकडून त्यांच्या कार्याला दररोज सलामी दिली जाते. माथेरानच्या एका ठराविक ठिकाणी मिनिटे्रनची शिळ वाजवून अब्दुल हुसेन सर आदमजी पिरभॉय यांना मध्य रेल्वेकडून आजही सलामी दिली जाते.

--

0 Response to "मिनीट्रेनचा जनकच उपेक्षित"
टिप्पणी पोस्ट करा