-->
भगवा दहशतवाद?? ...घंट्टा

भगवा दहशतवाद?? ...घंट्टा

भोपाळमधून प्रज्ञासिंह जिंकली आणि सोलापूरातून जय सिद्धेश्‍वर जिंकले याचे अपार दुःख काहींना झाले आहे. गांधींच्या विचारांची हत्या करणार्‍यांचा हा विजय असल्याचे तथाकथित पुरोगामी आणि ढोंगी सेक्युलर असलेल्या विचारवंतांनी जाहीरही करून टाकले. भोपाळ आणि सोलापूरचा निकाल वरकरणी दिसतो, तसा तो नाही. मतांचे ध्रुवीकरण या मतदारसंघांमध्ये धार्मिक आधारावर निश्‍चितच झाले... पण त्यामागे जनतेच्या मनातील धग, असंतोष आणि संताप आहे, हे टीका करणार्‍यांनी ध्यानात घ्यायला हवे. साध्वीला भोपळमधून दिलेली उमेदवारी ’हिंदू दहशवाद’ च्या आरोपाला उत्तर आहे, हे अमित शहा यांनी जाहीरपणे सांगीतलेे होते. आणि जनतेनेही या दोघांच्या माध्यमातून हिंदू किंवा भगवा दहशतवाद या आरोपाला सडेतोड उत्तर देत दोन भगवी वस्त्रधारी लोकशाहीच्या मंदिरात पाठविले. 
हिंदूंच्या ज्या - ज्या म्हणून धारणा, परंपरा, श्रद्धा आहेत त्या वाईट, बुरसटलेल्या, मागासगलेल्या आणि असहिष्णू आहेत हा विचार रुजविण्याचा प्रयत्न सातत्याने होत आहे. विविध माध्यमांमधून हा प्रयोेग अनेक वर्षांपासून सुरु आहे. लहान - लहान गोष्टींमध्येही आमच्या श्रद्धा, परंपरांना धक्का देत राहायचा हा प्रकार सर्वत्र दिसतो. होळीच्या निमित्ताने सर्फ एक्सेलची एक ’दाग अच्छे है’ ही जाहिरातसुद्धा ताजे उदाहरण म्हणून देता येईल. तोेच प्रकार आपल्या कुटुंब व्यवस्थेच्या बाबतीतही सुरु आहे. एकदा का समाजाचे धार्मिक अधिष्ठान संपवले, कौटुंबीक सौहार्द संपवले की समाज बेभान - बेफाम होतो. त्यासाठी तुमच्या पिढ्यान् पिढ्यांच्या मान्यतांवर जोेरदार वार करावा लागतो. तुमच्या सगळ्या श्रद्धांना अंधश्रद्धा ठरवून संभ्रम निर्माण करावा लागतो. श्रद्धांची हेटाळणी, टवाळी करून तुमची संस्कृती सनातन नव्हे तर मागास आहे हे बिंबवावे लागते. मग संभ्रमित लोक मग निराधार होतात. त्यांचा कशावरच विश्‍वास उरत नाही, भोगवादी समाज, जागतिक मोठी व्यापारपेठ तयार करणे सोपे जाते. वर्तमानात जगण्याची आणि त्यासाठी भावनाशून्य होऊन ’आपले आणि आपण’ हा विचार रुजवला जातो. आणि त्यातून राष्ट्रीयत्वाची भावना मारुन टाकणे सोपे जाते.
गेल्या दोन पिढ्यांपासून भारतीय समाजावर हेच बिंबविले जातेय, तेसुद्धा प्रयत्नपूर्वक. आधुनिकतेच्या नावाखाली भारतीयांना त्यांच्या संस्कृतिची कास सोडायला भाग पाडले जात आहे. त्यातच हिंदू किंवा भगवा दहशतवाद ही संकल्पना युवा पिढीतून संस्कृती, धर्म, परंपरांना जोखड मानायला शिकवते. जग निधर्मी असावे, असे कोेणालाही वाटत नाही. तसे वाटले असते तर आपल्यापेक्षा शेकडो वर्षांपूर्वी आधुनिक झालेल्या पाश्‍चिमात्य देशातील धर्म संपले असते. पण तिथेसुद्धा धर्म आणि त्यांच्यातील चौकटी कायम आहेत, उलटपक्षी त्या अधिक पोलादी होत आहेत. मग हिंंदूसुद्धा दहशतवादी असतात असे म्हटल्यानंतर कुंपणावर असलेल्यांचा आपल्याच धर्मावरील विश्‍वास डळमळीत होतो. त्यातून राजकीय पोळी भाजली जाते.
अख्ख्या जगात इस्लामिक दहशतवाद बोकाळला आहे. अतिरेक्याला धर्म नसते, हे म्हणणे म्हणजे शुद्ध धुळफेक आहे. अतिरेकी तयारच केले जातात ते मूळी धर्माच्या नावावर. हां, कोणी जन्मतः अतिरेकी नसतो, असं म्हटलं तर एकवेळ समजता येईल. पण धर्माच्या नावावर ब्रेन वॉशिंग करून दुसर्‍या देशात नरसंहार घडविण्यासाठी तयार झालेल्या नराधमांना धर्म नसतो, असं कसं पटेल. याबद्दल लोक विचार करू लागल्यानंतर भगवा दहशतवाद हा शब्द रुजविण्याचे षडयंत्र रचले गेले. वाचाळवीर दिग्विजयसिंग आणि सुशीलकुमार शिंदे यांनी त्यांच्याकडे असलेल्या राजसत्तेच्या जोरावर भगवा दहशतवाद सिद्ध करण्याचे आटोकाट प्रयत्न केले. पाकिस्तानातून आलेल्या कसाबच्या टोळीला ते पूरक होते. तसे नसते तर मुंबईत येताना हातात केशरी दोरे बांधून येण्याची त्यांना काय गरज होती? भगवा दहशतवाद हा शब्द मान्यच नाही. हिंदूंना तर नाहीच नाही. हा शब्द रुजविण्याचा प्रयत्न सुरु झाला, तेव्हापासून हिंदू समाज अस्वस्थ आहे. हीच अस्वस्थता प्रज्ञासिंह आणि जय सिद्धेश्‍वर यांच्या विजयाच्या रुपाने तमाम हिंदू समाजाने बाहेर काढली. ज्यांनी भगवा दहशतवाद सिद्ध करण्यासाठी पुढाकार घेतला होता, त्यांच्याच गावात त्यांना हिंदूंनी उत्तर दिलं. भगवा दहशतवाद ... घंट्टा... हेच ते उत्तर लाखो मतांच्या आघाडीतून दिलं गेलं. त्यामुळेच या दोघांच्या उमेदवारीचा आणि त्यांच्या बरळण्याचा काहीही परिणाम देशभरात कुठेच दिसून आला नाही.
प्रज्ञासिंह यांच्या विजयाला हिंदू दहशतवाद रुजविण्याच्या विचारांचा विरोध म्हणून बघायला हवं. गांधी हत्या, नत्थुरामचे उदात्तीकरण अशा प्रकारच्या बरळण्यातून काहीही साध्य होणार नाही. त्या बरळण्याला ती मते कोणीही दिली नसावित. त्यांना मिळालेली मतं ही आमचा धर्मावरचा विश्‍वास कायम आहे, हे दशर्र्विण्यासाठीची आहेत. म्हणूनच जगभरातील सर्व माध्यमांंनी मोदी विजयाला ’हिंदू राष्ट्रवादाचे पुनरुज्जीवन’ म्हटलंय.

1 Response to "भगवा दहशतवाद?? ...घंट्टा"

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel