राज ठाकरे धोका ओळखा
लोकसभेच्या निकालांनंतर महाराष्ट्रात सर्वाधिक विनोद झाले असतील तर ते राहुल गांधी आणि त्या खालोखाल राज ठाकरे यांच्यावर. राजकीय क्षेत्रात टीका होणे, आरोप होणे अगदी टोकाची भाषा वापरून टीका होणे हे एकवेळ चांगले म्हणता येईल, त्यातून राजकीय पलटवार करून प्रत्युत्तर देण्याची संधी असते. पण एखादा विरोधक हा टिकेऐवजी विनोदाचा विषय होत असेल तर ती बाब अत्यंत गांभीर्याने घेणे गरजेचे आहे. राज ठाकरे यांच्यावर लोकसभेच्या निकालानंतर टीका नव्हे तर विनोद होत आहेत, ही धोक्याची घंटा आहे.
लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात एकही उमेदवार नसताना सर्वाधिक चर्चेत राहिलेला नेता म्हणजे राज ठाकरे. ’लाव रे तो व्हिडीओ’ म्हणत मतदारांच्या टाळ्या - शिट्ट्या आणि वृत्तपत्रांच्या हेडलाइन मिळविण्यात राज यांना यश मिळाले. एकाही मतदारसंघात लोकसभा निवडणुकीत मनसेचा उमेदवार निवडून येणे तर सोडाच पण त्याची अनामतही वाचविणे शक्य नाही, याचा अंदाज आल्यामुळेच राज ठाकरेंनी काँगे्रस - राष्ट्रवादी काँग्रेसच्या ’बेगानी शादी’मध्ये प्रचाराचा निर्णय घेतला. मोदी - शहा जोडीला विरोध हा एकमेव अजेंडा राज यांंनी त्यांच्या प्रचार सभांमध्ये घेतला, मोदींच्या अनेक भाषणांचे आणि केंद्रीय मंत्र्यांचे व्हिडीओ वगैरे दाखवले हा सगळा घटनाक्रम उभ्या महाराष्ट्राने पाहिला, अनुभवला. मोदी आणि त्यांचे मंत्री खोटं बोलतात हे सांगण्याच्या प्रयत्नात राज यांनीही अनेक व्हिडीओ अर्धवट किंवा चुकीचे दाखवले. मेळघाटातील डिजिटल गावाचा दावा करणार्या सरकारला त्यांनी थेट हरिसाल येथून आणून त्या युवकाला स्टेजवर उभे केले... दहा सभा तेसुद्धा काँग्रेस - राष्ट्रवादीच्या निवडून येऊ शकणार्या मतदारसंघांमध्ये आयोजित करून आयते श्रेय मिळविण्याचाही प्रयत्न या माध्यमातून झाला. पण तो सपशेल फसला. दहा सभांना झालेल्या गर्दीने जर राज यांचे ऐकले असते तर महाराष्ट्रातील निकालाचे चित्र निश्चित वेगळे असते. तसे झाले नाही. या सभांचा लाभ विधानसभेच्या निवडणुकीत घेण्याचा मनसेचा प्रयत्न आहे, हे काही गुपित नाही. आरोपाचा एकेक बाण सत्ताधार्यांवर सोडून खळबळ उडवून देताना विधानसभेची गणितं पक्की करण्याचा राज ठाकरेंचा प्रयत्न होता. त्याशिवाय आक्रमकता दाखवून म्हणजे अगदी घरात घुसून मारा वगैरे सांगून तरुण मतदारांना आकर्षित करण्याची खेळी या माध्यमातून करता येईल, असे मनसेला वाटलेे असावे... म्हणूनच आता राज ठाकरे यांंनी योग्यवेळी धोका ओळखण्याची गरज आहे.
राज यांनी केलेल्या आरोपानंतर विशेषतः डिजिटल इंडियाच्या जाहिरातीतील तरुण मेळघाटातून थेट स्टेजवर आणल्यानंतर भाजपची घाबरगुंडी उडाली होती. सरकारी दाव्यांची आता पोलखोल होत असल्याचंं चित्रं निर्माण झालंं. पण सर्वप्रथम देवेंद्र फडणवीस यांनी राज ठाकरे यांच्या या पोलखोलची खिल्ली उडवली. ज्यांचा उमेदवार रिंगणात नाही, त्यांच्या सभेला लोक मनोरंजन म्हणून गर्दी करतात, असं सांगून फडणवीसांनी राज यांच्या सभांची धार बोथट करण्यासाठी पहिला फासा फेकला, आणि सत्ताधार्यांनी मोठ्या खुबीने हा मुद्दा जनतेपर्यंत पोहचवला. त्यात सोशल मिडियाचा सर्वात मोठा फॅक्टर होता. ज्या सोशल मिडियावर विरोेधात लिहिलेे म्हणून मनसेच्या कार्यकर्त्यांनी मारहाण करणे, उठाबशा काढायला लावणे असे प्रकार घडले, त्या सोशल मिडियाच्या हाती राज ठाकरे यांचे नाव न घेता विनोद करण्याचे एक अस्त्र लागले. तिथून राज यांच्या लाखोंच्या गर्दीच्या सभांचं गांभीर्य पद्धतशीरपणे संपवलं गेलं, यात यश आलं हे निकालाचे आकडे सांगतात.
एकदा का एखादा विषय मनोरंजनाचा ठरवला किंवा कमी महत्वाचा आहे असं म्हटलं की त्यातील गांभीर्य नष्ट होतं. राज यांची भूमिका राजकीय असली तरी ती जागल्याची भूमिका होती, यात वाद नाही. हा सूर्य हा जयद्रथ असे दावे आणि वस्तुस्थिती समोरासमोर मांडून सत्ताधार्यांना जाब विचारण्याचा तोे प्रकार होता. या भूमिकेत कोणीतरी असायलाच हवे. पण थेट जाब विचारणारा किंवा दाव्यांवर प्रतिदावा करणारा विनोदाचा विषय झाला की मूळ मुद्दा संपुष्टात येतोे. महाराष्ट्राच्या ब्ल्यू प्रिंटवरही असेच विनोद गेल्या विधानसभा निवडणुकीत होत होते. त्याचे प्रमाणे आज होणार्या विनोदांच्या तुलनेत कमी असलेे तरीही ब्ल्यू प्रिंट या विषयातील गांभीर्य संपल्यात जमा होते. आता विधानसभेची निवडणूक तोंडावर आहे. मनसेची त्यादृष्टीने बांधणी सुरु असेल, अशात एकदा का राज यांची वक्तव्ये विनोेद म्हणून घेण्याची जनतेची मानसिकता झाली तर... तर त्यांच्या भूमिकेचे महत्वच राहणार नाही. हाच प्रयोग आता राज्यात सुरु झाला आहे. राज यांच्यावर त्यांच्या विरोधकांनी टीका करावी, पण ते विनोदाचा, ’दाखवच रे तो व्हिडीओ’ ’फोड रे फटाके’ म्हणत टवाळीचा विषय होऊ नयेत, हा प्रयत्न करणे आवश्यक आहे. हा धोका वेळीच ओळखायला हवा. सोशल मिडियावर विनोद फॉरवर्ड करणार्यांना शिक्षा करून तो धोका संपणारा नाही. त्यासाठी त्यांना नव्याने प्रतिमा तयार करण्याचे कष्ट घ्यावे लागणार आहेत. त्यामुळे राज ठाकरे वेळीच धोका ओळखा...
- हिंदू दहशतवाद?? घंटा (उद्या)

0 Response to "राज ठाकरे धोका ओळखा "
टिप्पणी पोस्ट करा