-->
’भारतीय टायटॅनिक’चा प्रवासी    काळाच्या पडद्याआड

’भारतीय टायटॅनिक’चा प्रवासी काळाच्या पडद्याआड


भारतीय टायटॅनिक म्हणून ज्या बोटीचा उल्लेख करायला हवा त्या बुडालेल्या ’रामदास’ बोटीतील प्रवासी आणि काळाच्या झडपेतून त्यावेळी बचावलेले बारक्याशेट मुकादम आज काळाच्या पडद्याआड गेले. 
17 जुलै 1947 ला मुंबईहून सकाळी आठला रेवसकडे  निघालेली ‘रामदास’ बोट मुंबईपासून अवघ्या 9 मैलांवर असलेल्या ‘काश्या’च्या खडकाजवळ प्रचंड लाटांच्या तडाख्यामुळे कलती होऊन समुद्रात बुडाली. तिच्याबरोबर त्या बोटीने प्रवास करणार्‍या सुमारे हजारभर प्रवाशांपैकी सुमारे 625 जण समुद्रात बुडून मरण पावले. या भीषण दुर्घटनेतून 232 प्रवाशांचा जीव वाचला. त्यात रामदास बोटीचा कप्तान शेख सुलेमान आणि अलिबागचे बारक्याशेट मुकादम  समावेश होता. रेवस येथून पाच लहान बोटी मासळी घेऊन मुंबईला जात असताना त्यांना पाण्यावर तरंगणारी प्रेतं व माणसं दिसली. त्यांना वाचविण्यासाठी कोळी बांधवांनी आपल्या बोटीतील मासळी समुद्रात फेकून देत तब्बल 75 प्रवाशांना बोटींमध्ये घेतले. रामदास बोट बुडाल्याची माहिती बचावलेल्या काही प्रवाशांनी समुद्रातून पोहत ससून डॉकला जाऊन दुपारी तीनला माहिती  त्यानंतर या अपघाताची माहिती मुंबई बंदरातील अधिकार्‍यांना मिळाली. महाराष्ट्राच्या व देशाच्या प्रवासी जलवाहतुकीच्या इतिहासातील एक भीषण दुर्घटना अशी नोंद झालेल्या रामदास बोटीच्या अपघातानंतर प्रवासी जलवाहतुकीबाबतच्या नियमांत आमुलाग्र सुधारणा झाल्या. अत्याधुनिक दूरसंचार उपकरणे प्रवासी बोटींवर दिसू लागली. 
‘रामदास’ बोट सन  बांधली गेली. ती 406 टन वजनाची होती. 1942 मध्ये ती  सरकारने घेतली होती. ‘रामदास’वर वायरलेसची व्यवस्था नव्हती. मुंबई किनार्‍यालगत फेरी करताना रामदासवर 1050 उतारू व 42 खलाशी घेण्याची परवानगी होती. ज्या वेळी गोवा वगैरे भागात ही बोट जाई तेव्हा 615 उतारू व 10 हॉटेलचे नोकर व 42 खलाशी नेण्याची परवानगी  होती. रेवसला इतके लोक मुंबईहून एका वेळेस कधीच जात  पण 17 जुलै 1947 रोजी गटारी अमावस्या असल्याने त्या दिवशी गावातील घरी जाण्यासाठी उतारूंची खूप गर्दी झाली होती. रामदास बोटीची त्या वर्षीच नाविक अधिका-यांकडून पाहणी करण्यात आली होती व बोट चांगल्या स्थितीत असल्याचे तिला प्रमाणपत्रही मिळाले होते. सरकारी वर्गवारीत ही  9व्या प्रतीची होती. बुडालेल्या रामदास बोटीचे काही अवशेष अपघातानंतर  दहा वर्षांनी म्हणजे 1957 मध्ये मुंबईतील बेलॉर्ड पिअरच्या समुद्रकिनार्‍यावर वाहात आले होते. 
यापूर्वी 1927 च्या नोव्हेंबर महिन्यामध्ये ‘तुकाराम’ आणि ‘जयंती’ या बोटी कोकण किना-यावर एकाएकी झालेल्या ताशी 50 मैल वेगाने जाणार्‍या चक्रीवादळाच्या झंझावातात सापडून बुडाल्या होत्या. त्यानंतर सुमारे वीस वर्षांनी 1947 मध्ये रामदास बोट बुडून भीषण अपघात झाला. या  अपघातातून वयाच्या 13 - 14 व्या वर्षीय बारक्याशेट मुकादम पोहत किनार्‍यावर आले होते. भारतीय टायटॅनिकचा हा अखेरचा साक्षीदार आज काळाच्या पडद्याआड गेला. 

0 Response to "’भारतीय टायटॅनिक’चा प्रवासी काळाच्या पडद्याआड "

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel