-->
सवय कायम राहावी

सवय कायम राहावी



एकदा इंद्रदेव सर्वांवर कोपले. त्यांनी शाप दिला पुढची 12 वर्षे पाऊस पडणार नाही व तशी आकाशवाणी केली.

पृथ्वीवर सर्वदूर हाहाकार माजला.

सर्वजण हताश झाले.

12 वर्षे पाऊस येणार नाही म्हणजे सर्व मनुष्य, प्राणी दुष्काळाने मरणार या विचाराने सर्वजण घाबरून गेले.

एक शेतकरी जंगलातून रोज पाणी भरून आणायचा आणि आपली गुरे व कुटुंबाला पाणी द्यायचा.

थोड्याच दिवसात जंगलातील पाणी साठाही संपून गेला. शेतकरी पाण्याच्या शोधात जंगलात फिरू लागला असता त्याला एक विलक्षण दृश्य दिसले -

एक मोर आपल्या पिलांना नाचायला शिकवत होता.

त्या पिलांनी मोराला विचारले :-

जर 12 वर्षे पाऊस पडणार नसेल तर आपण नाचून किंवा नाच शिकून काय फायदा?




मोर म्हणाला:-

पाऊस येणार नाही म्हणून आपण जर आतापासून नाचणे किंवा नाच शिकणे बंद केले,

तर जेंव्हा 12 वर्षांनी पाऊस पडू लागेल तेव्हा आपण सारे नाचणे विसरूनच गेलो असू.




शेतकरी हा संवाद ऐकून अवाक झाला.

तो धावतच घरी आला, शेतीची अवजारे गोळा केली आणि दुसर्‍या दिवशी आपल्या मुलांना घेऊन शेतावर गेला. आणि कोरडे शेत नांगरु लागला, मुलांना शेतीची कामे शिकवू लागला.

मुले चकित होऊन बापाकडे पहात होती.

त्यांनी त्याला विचारले ः

बाबा जर 12 वर्षे पाऊस पडणार नसेल तर आपण आता शेत नांगरून मशागत करून काय फायदा?




शेतकरी म्हणाला:-

आपण शेतीची कामे शिकलो नाही किंवा करणे बंद केली, तर 12 वर्षांनी पाऊस पडेल तोपर्यंत आपण सर्व कामे विसरून जाऊ. आणि पुन्हा कमाला लागला.




इंद्रदेव आकाशातून या कुटुंबाला व शेतकर्‍याला काम करताना बघून अचंबित झाला.

त्याने शेतकर्‍याला विचारले ः-

तु आकाशवाणी ऐकली नाहीसका?




शेतकरी म्हणाला:-

होय ऐकली. पण जर मी काम केलं नाही किंवा माझ्या मुलांना शेतीची कामे शिकवली नाही,

तर माझ्या पुढच्या पिढीला शेतीचे काहीच काम येणार नाही. मग जेव्हा पाऊस पडेल तेव्हा ते उपाशी राहतील.




चार मित्र बसले होते ः- त्यांनीही आकाशवाणी ऐकली होती, नोटबंदीमुळे तंगी होती, महागाईच्या झळांनी त्रस्त होते. तरीही जय्यत तयारी सुरु होती.

इंद्राने विचारले ः- कसली तयारी?

चौघंही म्हणाले ः- गटारीची... 12 वर्ष पाऊस आला नाही, तरीही गटारीची तयारी दरवर्षी करायलाच हवी. कारण जेव्हा पाऊस पडेल, त्यावेळी गटारी साजरी कशी करायची, याचा विसर आम्हाला पडला तर???




इंद्र सुन्न झाला.

स्वर्गात आल्यावर विचार करु लागला कि, जर मी 12 वर्षे पाऊस पाडला नाही तर मीसुद्धा पाऊस कसा पाडायचा ते विसरून जाईन. मग सर्व सृष्टी करपुन जाईल, जैव सृष्टी नष्ट होईल.

देवाने लगेचच विचार बदलला.

आपला शाप मागे घेतला आणि भरपूर पाऊस पाडायला सुरुवात केली.

.

.

.

तात्पर्य ः-

सत्ता असली तरीही आंदोलनं, मोर्चे काढत रहायचे, कार्यकर्त्यांच्या हुंकाराला फुंकर घालत राहायची. कारण सत्ता गेली तरीही कार्यकर्ते ’आवाज कुणाचा...’ हे ओरडायला विसरायला नकोत.


0 Response to "सवय कायम राहावी"

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel